Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील पूरस्थितीवर ‘ड्रोन’ची नजर

जिल्ह्यातील पूरस्थितीवर ‘ड्रोन’ची नजर

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 26 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पूरस्थितीवर ‘ड्रोन’ कॅमेर्‍याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. पूरस्थितीत योग्य ठिकाणी, वेळेवर मदतीसाठी हा कॅमेरा फायदेशीर ठरणार आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी असा कॅमेरा खरेदी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.जिल्ह्यात अपवाद वगळता दरवर्षी समाधानकारक पाऊस होतो. त्यामुळे जिल्ह्यात दोन ते तीन वेळा पूरस्थिती निर्माण होते. पूरस्थितीत बाधितांना मदत करताना अनेकदा नेमके स्थिती, ठिकाण यामुळे अडचण निर्माण होते. त्यामुळे मदत अथवा बचाव कार्याला विलंब होण्याची शक्यता असते.

पूरस्थितीत जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. पुरात वाहून जाणार्‍यांचेही प्रमाण अधिक आहे, त्यांचा शोध घेण्यासाठी ‘ड्रोन’ कॅमेर्‍याची मदत होऊ शकते. या कॅमेर्‍यामुळे नेमके ठिकाण स्पष्ट झाले तर त्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचविणे शक्य होणार आहे. यासह पूरस्थितीची दररोजची स्थिती, वाढत जाणारे, पसरत जाणारे पाणी आदीचे भौगोलिक चित्र यामुळे स्पष्टपणे समजणार आहे. यामुळे पूरस्थितीत दैनंदिन व्यवस्थापन करताना प्रशासनाला मदत होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज विविध भागांतून नागरिकांची ये-जा सुरू असते. यापैकी काही जणांकडे तंबाखू, मावा असे पदार्थ असतात. तंबाखू, मावा कार्यालय अथवा आवारात आणण्यास मज्जाव करता येईल का, त्यादृष्टीने यंत्रणा उभी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा विचार सुरू आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक बंदी

जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या आवारात प्लास्टिकच्या साहित्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.