Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Kolhapur › हल्लेखोरांवर दरोड्याचे गुन्हे

हल्लेखोरांवर दरोड्याचे गुन्हे

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:33AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शास्त्रीनगर-यादवनगरात नंग्या तलवारी भिरकावत, तसेच वाहनांवर तुफान दगडफेक करीत दहशत माजविणारा मुख्य संशयित अभिषेक राजेंद्र सावंत (वय 24, रा. शास्त्रीनगर) याच्यासह 11 जणांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. संशयितांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अभिषेकसह ओमकार भगवंत पाटील (25, रा. शास्त्रीनगर), सनी राजेंद्र सावंत (27), अजिंक्य विनायक आरगे (26, रा. म्हाडा कॉलनी), रवी हरीलाल यादव (27), इमामहुसेन खुदबुद्दीन कुरणे (38, रा. यादवनगर), नावेद अयाज मुजावर (20, रा. यादवनगर), मुजममिल खुदबुद्दीन कुरणे (25), शकील जहाँगिर मुजावर (28, रा. उद्यमनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अन्य दोन बाल संशयितांची बालसुधारगृहात रवानगी केल्याचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.  युवतीच्या छेडछाडीतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. जमावाने केलेल्या हल्ल्यात आठ-दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तर अनेक घरांवर दगडफेक करून नासधूस करण्यात आली आहे. या घटनेमुळे गुरुवारी दुसर्‍या दिवशीही परिसरात तणाव होता.