Sat, Feb 23, 2019 11:01होमपेज › Kolhapur › गगनबावडा येथे डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनी रविवारी कार्यक्रम

गगनबावडा येथे डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनी रविवारी कार्यक्रम

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 12:53AMगगनबावडा : वार्ताहर

गगनबावड्याचे सुपुत्र ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचा स्मृतिदिन रविवारी (दि. 20 मे)आहे. त्यांच्या स्मृतिदिनी गगनबावडा जन्मभूमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम किल्ले गगनगडावरून प्रेरणाज्योत आणली जाणार आहे. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी 10 वाजता वक्तृव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील स्पर्धकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सायंकाळी 5 वाजता श्री रामेश्‍वर मंदिर येथे डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर माजी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे ‘माध्यम आणि माणूस’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने  आयोजित कार्यक्रमाला  जिल्हा बँकेचे संचालक पी. जी. शिंदे, पंचायत समिती सभापती मंगला शिंदे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंगराव पाटील, गडनबावड्याच्या सरपंच ज्योती घाटगे आदी  उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गगनबावड्याचे उपसरपंच रवींद्र कांबळे, कार्यक्रमाचे संयोजक माजी सरपंच  नंदकुमार पोवार यांनी  केले आहे.