होमपेज › Kolhapur › डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयास नॅककडून ‘ब’ मूल्यांकन प्राप्‍त

डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयास नॅककडून ‘ब’ मूल्यांकन प्राप्‍त

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 05 2018 1:18AMगगनबावडा : प्रतिनिधी

गगनबावडा येथील आनंदी महाविद्यालयास (नवीन नाव पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय) नॅक  बेंगळूरू यांचेकडून प्रथम मूल्यांकन करून महाविद्यालयास ‘ब’ मूल्यांकन प्राप्‍त झाले आहे. 

नॅकतर्फे दि. 23 व दि. 24 एप्रिल रोजी कुलगुरू ए. के. मिथल (उत्तरप्रदेश), प्राचार्य सुमंत अगरवाल (दिल्ली) आणि प्रा. डॉ. के. हेमलता (तामिळनाडू) यांच्या टीमने महाविद्यालयास भेट देऊन संबंधित घटकांचे मूल्यांकन करून आपला अहवाल सादर केला. नॅकच्या सुधारित कार्यपद्धतीनुसार मूल्यांकन झालेले आनंदी महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठ कक्षेतील पहिलेच महाविद्यालय होय.

मूल्यमापन प्रक्रियेसाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई, प्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा, समन्वयक डॉ. संदीप  पानारी  आदी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी पालक यांचे बहुमोल सहकार्य लाभले.