Tue, May 21, 2019 04:26होमपेज › Kolhapur › डॉ. जाधव यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची डॉक्टरेट

डॉ. जाधव यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची डॉक्टरेट

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 12:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबाबत दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा डी. लिट. पदवी देऊन सन्मान केला जाणार आहे. दि. 29 मार्च रोजी होणार्‍या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉ. जाधव यांना डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा नववा पदवीदान समारंभ गुरुवार, दि.29 रोजी संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथील विद्यापीठाच्या प्रांगणात दुपारी चार वाजता होणार आहे. समारंभाचे प्रमुख पाहुणे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्नातकांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. या  सोहळ्यात दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व पारनेर येथील गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. विष्णू पारनेरकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स, तर भुवनेश्‍वर येथील केआयआयटी आणि केआयएसएसचे संस्थापक प्रो. अच्युत समंथा यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केली जाणार आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Dr. D.Y. Patil university, announce D. Lit. Honor, Chief Editor, Daily Phudhari, Dr. Pratapsingh Jadhav