Fri, Jan 18, 2019 22:00होमपेज › Kolhapur › संभाजी भिडे, पालकमंत्री यांच्यात बंद खोलीत चर्चा

संभाजी भिडे, पालकमंत्री यांच्यात बंद खोलीत चर्चा

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सोमवारी कोल्हापुरात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी भेट घेतली. शासकीय विश्रामगृहावर सुमारे तासभर या दोघांत बंद खोलीत चर्चा झाली. 

पालकमंत्री पाटील सोमवारपासून जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. सकाळी जिल्हा परिषदेतील भाजप आघाडीच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. बैठक सुरू असताना भिडे दुपारी चारच्या सुमारास  विश्रामगृहावर आले. बैठक संपल्यानंतर पाटील यांनी भिडे यांची भेट घेतली. चर्चेचा तपशील समजला नाही. ते वैयक्तिक कामासाठी आल्याचे समजते. यावेळी गोकुळचे संचालक बाबा देसाई उपस्थित होते.