Thu, Apr 25, 2019 11:35होमपेज › Kolhapur › महिन्याभरात डिझेल दरात साडेतीन रु. वाढ

महिन्याभरात डिझेल दरात साडेतीन रु. वाढ

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 12:39AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या महिन्याभरात डिझेलच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. कधी पाच तर कधी दहा पैशांनी दिवसेंदिवस इंधनात वाढ होत असल्याने ही वाढ ग्राहकांच्या ध्यानात येत नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी महिन्यातून दोनदा केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करत होते. आता दररोज काही पैशांमध्ये इंधन दर कमी-जास्त होत असतात;  पण पैशात कमी-जास्त होणार्‍या या दराची माहिती ग्राहकांना समजून येत नाही. महिन्याभरात इंधन दराचा आढावा घेतला तर वाढलेल्या दराची माहिती ग्राहकांना मिळू शकते. 

10 नोव्हेंबर 2017 ला डिझेलचा प्रतिलिटर दर 60 रुपये 23  पैसे होता. तोच दर 10 जानेवारी 2018 रोजी 63 रुपये 64 पैसे झाला आहे. म्हणजे डिझेलच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. हीच वाढ महिन्यात एकदम केली असती तर ग्राहकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले असते. पण पैशापैशाने होणारी दर वाढ ही ग्राहकांच्या ध्यानात येत नसल्याने इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, हे स्पष्ट होते. वाढत्या इंधनाचा थेट महागाईवर परिणाम होत असून शासनाने यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.