Fri, Aug 23, 2019 15:49होमपेज › Kolhapur › धारीवाल कुटुंबीयांनी सामाजिक कार्याचा वसा जोपासला

धारीवाल कुटुंबीयांनी सामाजिक कार्याचा वसा जोपासला

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 1:53AMकागल ः प्रतिनिधी

धारीवाल कुटुंबीयांनी सामाजिक कार्याचा वसा जोपासला आहे, असे गौरवोद‍्गार दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी काढले. कागल तालुक्यातील करनूर येथील माणिकचंद ऑक्सिरिच पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व कशिश फूड अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी खासदार धनंजय महाडिक, आर. एन. धारीवाल फाऊंडेशनच्या चेअरपर्सन शोभाताई रसिकलाल धारीवाल, मॅनेजिंग डायरेक्टर जान्हवी रसिकलाल धारीवाल, अजित जैन आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. जाधव म्हणाले, माणिकचंद ऑक्सिरिच ब्रँडने दर्जा टिकवून ठेवला आहे. रमेश लालवाणी यांनी या मोठ्या उद्योगाशी आपले नाते जोडल्यामुळे ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. धारीवाल कुटुंबीयांशी आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यांच्या कन्या जान्हवी यांनी चांगले काम करून उद्योग मोठा केला आहे. 

पैशांमुळे बँक बॅलेन्स वाढतो; पण पैशांपेक्षा पुण्याई नेहमीच मोठी असते. सामाजिक कार्यातून धारीवाल यांनी पुण्याई कमावली, असेही डॉ. जाधव म्हणाले. खा. महाडिक म्हणाले, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते सुरू झालेले उद्योग भरारी घेतात. त्यामुळे ऑक्सिरिच चांगली भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही.

आर. एन. धारीवाल फाऊंडेशनच्या चेअरपर्सन श्रीमती शोभाताई धारीवाल म्हणाल्या, धारीवाल यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले. जान्हवी रसिकलाल धारीवाल यांनी वडिलांच्या आठवणी जागवल्या. अजित जैन, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्‍त केले.

दरम्यान, प्रमुख पाहुण्यांनी माणिकचंद ऑक्सिरिच अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजची पाहणी केली. रमेश लालवाणी यांनी स्वागत केले. जान्हवी गोपीचंद लालवाणी यांनी आभार मानले. 

यावेळी करनूरचे सरपंच सचिन घोरपडे, संजय नाईक, गोपीलाल लालवाणी, ब्र्रिजलाल संघवी, रोहित पाटील, सागर पाटील, दिलीप मोहिते, मोहनराव जाधव, अशोक निहालनी, रवींद्र संचेती, कापडिया यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले.