होमपेज › Kolhapur › ‘मी शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर’

‘मी शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर’

Published On: Dec 01 2017 10:39AM | Last Updated: Dec 01 2017 10:39AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

आपण शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर आहेच, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. रेल्वे स्थानकावरील बैठक आटोपल्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यांनी टीका करणे ही आपली संस्कृती नाही, असेही सांगितले. खा. महाडिक म्हणजे जत्रेतील किल्लीचा ट्रॅक्टर, अशी टीका आ. पाटील यांनी केली होती. याबाबत ते म्हणाले, मी शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर आहे.  पण दूध उत्पादकांच्या विरोधात कधीच नाही. केवळ संघाचा नावलौकिक खराब होऊ नये, यासाठी आपण ‘गोकुळ’च्या समर्थनार्थ काढण्यात येणार्‍या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.