Mon, Apr 22, 2019 15:48होमपेज › Kolhapur › नवसानं मुल झालं अन् मुकं घेऊन मारलं: धनंजय मुंडे

नवसानं मुल झालं अन् मुकं घेऊन मारलं: धनंजय मुंडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

‘सरकारने हल्लाबोलचा असा धसका घेतला आहे की आता सरकारमधील लोक टीका करत आहेत. या सरकारमधील मंत्र्यांनी सत्ता येताच मोठ-मोठे भ्रष्टाचार केले आहेत. नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवर टीका करणा-या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना त्यांच्या खात्यात झालेला तूरीचा 2500 कोटींचा घोटाळा आठवतो का ? स्वतःच्या कारखान्यासाठी शेतक-यांच्या नावावर कर्ज काढून केलेली फसवणूक आणि लूट माहीत आहे का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. 

एप्रिल फूल आणि भाजप

काल देशभरात एप्रिल फूलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फूल होत असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.   

देवीला साकडं 

कोल्हापुरात काल आम्ही आई अंबाबाईचा रथ ओढला आणि तिला साकडं घातलं की राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. या सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ दे, असे अंबाबाई चरणी साकडं घातल्याचे मुंडे यांनी सांगितले. 

आता ते दिवस उरले नाही : सुनिल तटकरे

तरुणांना रोजगार नाही, त्यांचीही सरकारने फसवणूक केली. राज्यात अनेक पदं रिक्त आहेत. मात्र, सरकार रिक्त पदे भरत नाही, उलट रिक्त पदे रद्द करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी केला.  

शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना सर्व नीट सुरु होतं, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत होतं. पिकांना भाव दिला जात होता. जेव्हा संकट यायचं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचे काम सरकारकडून व्हायचं पण आता ते दिवस उरले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

Tags : Dhannajay Munde, National Congress Party, BJP, Congress, Hallabol, Kolhapur


  •