Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Kolhapur › कुरुंदवाड : चार जणांना डेंग्यूची लागण

कुरुंदवाड : चार जणांना डेंग्यूची लागण

Published On: Dec 01 2017 4:14PM | Last Updated: Dec 01 2017 4:14PM

बुकमार्क करा

कुरूंदवाड : वार्ताहर

कुरूंदवाड  येथे ४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर सांगली येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर ८ जणांना डेंग्यूची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.

आरोग्य विभाग स्वच्छतेच्या दृष्टीने निकामी ठरत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वसाहतीत डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या भागातील गटारींची वेळेत स्वच्छता होत नाही. औषध फवारणी केली जात नाही याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाला वारंवार सांगून देखील कारवाई होत नसल्याने आरोग्य विभाग शिकलगर वसाहतीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असून एखादी जीवितहानी झाल्यावर प्रशासन जागे होणार का?, असा संतप्त सवाल शिकलगर समाजाच्या वतीने होत आहे. पालिकेने याबाबत तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अन्यथा सहकुटुंब पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.