Fri, Apr 26, 2019 09:26होमपेज › Kolhapur › मुलाला डांबून ठेवून दोन कोटींची मागणी

मुलाला डांबून ठेवून दोन कोटींची मागणी

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कौटुंबिक वादातून मुलाला डांबून ठेवून दोन कोटींची मागणी केल्याप्रकरणी पतीने पत्नीसह सासरच्या मंडळींविरुद्ध न्यायालयात तक्रार दिली. गिरीश प्रकाश भंडारे (रा. राजारामपुरी, 2 री गल्‍ली) असे तक्रारदाराचे नाव आहे. पत्नी, सासू, सासर्‍यासह मेहुण्याविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

गिरीश भंडारे यांचा सुप्रिया हिच्याशी 2007 रोजी प्रेमविवाह झाला. त्यांना शौर्य नावाचा एक मुलगा आहे. लग्‍नानंतर काही वर्षांनी दोघांत वाद झाल्याने त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. गिरीश यांची पत्नी सुप्रिया, सासरे मोहन मांगलेकर, सासू सुनीता, मेहुणा स्वप्निल (सर्व रा. फुलेवाडी) हे गिरीश यांचा मुलगा शौर्यला अज्ञात ठिकाणी लपवून त्याला भेटण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. याप्रकरणी तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राजारामपुरी पोलिसांना दिले.