Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Kolhapur › संविधान जाळणार्‍यांवर कारवाईची मागणी

संविधान जाळणार्‍यांवर कारवाईची मागणी

Published On: Aug 14 2018 1:10AM | Last Updated: Aug 14 2018 12:01AMदिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. आज सोमवारी या घटनेचा निषेध करून संविधानाची प्रत जाळणार्‍या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन सोमवारी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार आदींना देण्यात आले. तसेच विविध ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली.

पिपल्स रिपब्लिकन पार्टी

कोल्हापूर :   भारतीय संविधानाची प्रत जाळणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन पिपिल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशद्रोह्यांच्या माध्यमातून देशाच्या संविधानालाच जाहीर आव्हान दिले जात आहे.  संविधानाची प्रत जाळण्याच्या घटनेचा आम्ही निषेध करत असून संबंधितांवर देशद्रोहाचा खटला भरावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, सरचिटणीस विद्याधर कांबळे, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, आर. बी. कोसंबी, लताताई नागावकर, शिवाजी कांबळे, आनंदा कांबळे, रमेश कांबळे, विलास भास्कर, निवास सडोलीकर,, सतीश कांबळे, रतन कांबळे, राकेश चौगुले आदींचा सहभाग होता.

बळीराजा पार्टी

बाळीराजा पार्टीच्या वतीनेही याच मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात महासचिव दिगंबर लोहार, शोभा खेडकर, किसन काटकर, दत्तात्रय सुतार, संजय काटकर, आदींचा समावेश होता. 

बौद्ध अवशेष, विचार संवर्धन समिती

कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीच्या वतीने  दोषींवर तत्काळ कारवाई करून त्यांना देशद्रोही जाहीर करा आदी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात टी. एस. कांबळे, बापूसाहेब कांबळे, सर्जेराव थोरात, अमोल वाडेकर, प्रवीण कांबळे, अजित कांबळे, सरेश कुरणे आदींचा समावेश होता.

बहुजन क्रांती दलित संघटना

बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीनेही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. शिष्टमंडळात अध्यक्ष सागर कुरडे, संजना कुरडे, प्रभाकर कांबळे, सर्जेराव कांबळे, अजित कांबळे, बळवंत सडोलीकर, गणेश कांबळे, ज्ञानेश्‍वर कांबळे, अरुण कांबळे आदींचा सहभाग होता.

दोषींचे नागरिकत्व रद्द करा ः ब्लॅक पँथरतर्फे दसरा चौकात निदर्शने 

ब्लॅक पँथरच्या वतीने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.  यावेळी सुभाष देसाई, बाबुराव जैताळकर, विश्‍वास कांबळे, तुकाराम कांबळे, पुंडलिक नाईक, धोंडिराम कांबळे, सविता रायकर, दिपाली कांबळे,  छाया देशमुख, पंचशिला साळवे आदी उपस्थित होते. 

लहुजी शक्‍ती सेना

लहुजी शक्‍ती सेनेच्या वतीने बिंदू चौकामध्ये निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनात अशोक भंडारे, कुमार दाभाडे, अ‍ॅड. दत्ता कवाळे, अमर तडाखे, आशिष पांढरे, संतोष गायकवाड, कृष्णात हेगडे, अमित सकटे, अमरा तडाखे,  रोहित लोखंडे, रघुनाथ कांबळे आदी सहभागी झाले होते.

संविधान बचाव कृती समिती

संविधानाची प्रत जाळणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन संविधान बचाव कृती समिती, सदर बाजार विचारे माळ यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी सुस्मिता माने, शेखर कांबळे, संतोष जगताप, उमेश कांबळे, रोहन वाघमारे, रुपेश कांबळे, नितीन कांबळे आदी उपस्थित होते.

आजर्‍यात आंबेडकरी पक्ष, संघटनांचा भर पावसात मोर्चा

आजरा ः प्रतिनिधी
तालुक्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या वतीने भर पावसात मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार कार्यालयासमोर येऊन मोर्चेकरांनी तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाषणातून शासनावर रोष व्यक्‍त केला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवृत्ती कांबळे, प्रकाश मोरुस्कर, राजेंद्र कांबळे, विजय कांबळे, गणपती राजदीप, अविनाश कांबळे यांच्यासह रिपाई, ब्लॅक पँथर, बौद्ध महासंघ व दलित मानवी हक्‍क या संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.