Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Kolhapur › नियमित कर्ज परतफेड करणार्‍या दीड लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ

नियमित कर्ज परतफेड करणार्‍या दीड लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:32PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या कर्जमाफीचा लाभ किती शेतकर्‍यांना मिळाला, याची चर्चा चालू असतानाच शासकीय पातळीवरही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या खात्यांची काथ्याकुट सुरू आहे. त्यातून काय निष्पन्‍न होणार याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा सुरू आहे. या योजनेंतर्गत नियमित कर्जाची फरतफेड करणार्‍या मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील  1 लाख 52 हजार 336  शेतकर्‍यांना 243 कोटी 38 लाख 94 हजार 686 रुपयांचा लाभ मिळाला आहे. 

थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील 16 हजार 029 शेतकर्‍यांना 57 कोटी 48 लाख 92 हजार 406 रुपये लाभ मिळाला आहे. सधन जिल्ह्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या कमी आहेत, असे सांगण्यात येत आहे. 

राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली. ही योजना जाहीर करत असताना जून 2016 पर्यंत ज्या शेतकर्‍यांचे कर्ज थकीत आहे, त्यातील दीड लाखाचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना 25 टक्के प्रोत्साहन अनुदान (बक्षीस) देण्याचेही जाहीर करण्यात आले होते. 

कोल्हापूर, सांगली, सातारा या हरितपट्ट्यातील जिल्ह्यांचा विचार करता येथील शेतकरी हे सहकारी बँक, सोसायट्यांकडून दरवर्षी पीक कर्ज घेतात. त्या कर्जाची दरवर्षीच परतफेडही केली जाते. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या तशी कमीच आहे. शासनाने कर्जमाफीची योजना जाहीर केल्यामुळे तसेच नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 25 टक्के प्रोत्साहन योजना लागू आहे. कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले होते. शासनाने या अर्जांची छाननी केली  त्यावेळी नियमित कर्जाची परतफेड करणारेच अधिक होते. त्यामुळे शासनाने कर्जफाफीचा लाभ देत असताना प्रत्येक टप्प्यामध्ये नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून निधी देऊन त्यांचे कौतुक केले आहे. याचबरोबर थकबाकीदार शेतकर्‍यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचा विचार करता कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आघाडीवर आहेत. या तीन जिल्ह्यातील 3 लाख 83 हजार 689 शेतकर्‍यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन योजनेंतर्गत 605 कोटी 92 लाख 76 हजार 79 रुपयांचा लाभ मिळाला आहे. 

जिल्ह्यातील 41 हजार अर्जांची छानन

कर्जमाफी योजनेमध्ये सरकार आता ज्या शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत, त्या शेतकर्‍यांच्या अर्जातील माहितीची सत्यता पडताळून पहात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नुकतीच 41 हजार अर्जांची छाननी करून ते अर्ज शासनाला सादर केले आहेत. नव्या येणार्‍या यादीतून  किती शेतकरी कमी होणार हे सांगता येणार नाही. मात्र, थकबाकीदार शेतकर्‍यांपेक्षा नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने या योजनेत समाविष्ट करून त्यांचे कौतुकच केले आहे. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, Debt relief, farmers,