Sun, Aug 25, 2019 08:46होमपेज › Kolhapur › ...तेव्हाच शेतकर्‍यांना कर्जमाफी 

...तेव्हाच शेतकर्‍यांना कर्जमाफी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रीन लिस्टमध्ये नाव असलेल्या शेतकर्‍यांच्या कागदपत्रांची खातरजमा करून 24 तासांच्या आत कर्जमाफीची रक्‍कम खात्यांवर जमा करा, असे शासनाचे आदेश आले आहेत; पण खातरजमा झालेली खातेनिहाय रक्‍कमच अजून शासनाकडून जिल्हा बँकेला प्राप्‍त झालेली नाही. जोवर शासनाकडून रक्‍कम जमा होत नाही, तोवर शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा केली जाणार नाही, असा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे.

जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हा बँकेने ऑनलाईन अर्ज भरून घेतले आहेत. या योजनेसाठी 1,847 संस्थांनी 2 लाख 57 हजार 884 शेतकर्‍यांनी कॉलम नंबर 1 ते 66 प्रमाणे फॉर्म भरून दिले आहेत. 

जिल्हा बँकेच्या 53 हजार 262 थकबाकीदार शेतकर्‍यांना 22317.67 लाख, तर 209205 नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 36195.80 लाख असे एकूण 58523.47 लाख इतकी रक्‍कम बँकेला शासनाकडून मिळणे अपेक्षित होते. दिवाळीमध्ये आलेल्या आदेशानुसार 22 सभासदांचे 10 लाख 88 हजार 932 रुपये शासनाकडून येणे दर्शवून जिल्हा बँकेने संबंधित शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांवर जमा केली. मात्र, शासनाकडून 92 हजार 641 रुपयेच जमा झाले आहे. अजून 9 लाख 96 हजार 291 रुपये बँकेला मिळालेलेच नाहीत. 

पहिल्या टप्प्यात 1013 थकबाकीदार शेतकर्‍यांनी 384.07 लाखाची रक्‍कम प्राप्‍त झाली. परंतु, शासनाने सादर केलेल्या ग्रीन लिस्टमध्ये लाभार्थ्यांची रक्‍कम कमी -जास्त असणे, अपात्र लाभार्थ्यांची नावे रक्‍कम येणे इत्यादी कारणामुळे 22 लाख 27 हजार 772 रकमेचा जमा-खर्चही करता आलेला नाही. उर्वरित रक्‍कम शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांवर जमा झाली आहे. 

दुसर्‍या टप्प्यामध्ये 688 थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी 3,13,00,500 रक्‍कम व 6,29,90,875 अशी 9,42,91,409 इतक्या रकमेची यादी शासनाच्या ग्रीन लिस्टमध्ये प्रसिद्ध झाली आहे. प्राप्‍त झालेल्या यादीमधील शेतकर्‍यांचा कर्ज खाते क्रमांक, बचत खाते, कर्ज रक्‍कम आदीबाबतची माहिती बँक पातळीवर खातरजमा करून ती 24 तासांच्या द्यावी, अशी शासनाची सूचना आहे; पण मागील अनुभव वाईट असल्याने रक्‍कम बँकेच्या खात्यावर आली, तरच शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.