Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Kolhapur › बुडणार्‍या महिलेला वाचवताना दोघांचाही मृत्यू

बुडणार्‍या महिलेला वाचवताना दोघांचाही मृत्यू

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 1:51AM

बुकमार्क करा
खुपिरे : वार्ताहर

विहिरीत बुडणार्‍या महिलेला वाचवताना महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी येथे घडली. सावित्री बळवंत बंगे (वय 42) या पाणी आणण्यासाठी बंगे जाळवा नावाच्या शेतातील विहिरीवर गेल्या होत्या. तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. शेजारच्या शेतात काम करणार्‍या सरदार महादेव पाटील (47) यांनी आवाज ऐकून विहिरीकडे धाव घेतली. पाटील यांनी विहिरीत उडी घेतली; पण सावित्री यांनी घाबरून पाटील यांना पकडल्याने पाटील यांना पाण्याबाहेर येता आले नाही. दरम्यान, सावित्री यांचे दीर कृष्णात विहिरीवर आले. त्यांनीही पाण्यात उडी घेतली; पण सावित्री व पाटील यांना वाचवण्यात त्यांना अपयश आले. 

सावित्री यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, मुलगी तर पाटील यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बंगे आणि पाटील यांचा परिवार उघड्यावर पडला असून परिसरावर शोककळा पसरली आहे.