Thu, Feb 21, 2019 11:43होमपेज › Kolhapur › मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वडणगे : वार्ताहर

सोनतळी (ता. करवीर) येथील सदाशिव शंकर गायकवाड (वय 80) यांचा मधमाशांनी हल्‍ला केल्याने जागीच मृत्यू झाला. ते शनिवारी सकाळी मोती तलावाजवळ जळण काढण्यासाठी गेले होते. जळण काढताना झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला धक्‍का लागला. माशांनी त्यांच्यावर हल्‍ला केला. त्यांनी जवळच असणार्‍या तलावात उडी घेतली. काही वेळानंतर त्यांनी पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला; पण तरीही मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. पाण्याबाहेर येताच एकाच वेळी हजारो माशांनी त्यांच्यावर जोरदार हल्‍ला केला.

आजूबाजूच्या लोकांनी उसाचा पाला पेटवून माशांना पळवण्याचा प्रयत्न केला; पण बराच वेळ तेथून माशा हटल्या नव्हत्या. माशांच्या या जोरदार हल्ल्यात गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सुरेश कुरणे, अमर मोरे, शशिकांत खोडसे, व्यंकटेश इंगळे, जोतिराम फाले, मनोहर घाटगे, संभाजी कांबळे, संभाजी पाटील यांच्यावरही माशांनी हल्‍ला केला.