Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Kolhapur › दै. पुढारी ‘एज्यु दिशा 2018’ चा आज प्रारंभ

दै. पुढारी ‘एज्यु दिशा 2018’ चा आज प्रारंभ

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 26 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण वळण म्हणजे दहावी - बारावीचे वर्ष. करिअरच्या या टप्प्यावर विद्यार्थ्यांसह पालकांची द्विधा मनस्थिती निर्माण होते. म्हणूनच विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी दैनिक पुढारीने ‘एज्यु- दिशा 2018’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. संजय घोडावत विद्यापीठ प्रस्तूत दैनिक पुढारी ‘एज्यु दिशा’ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि. 26) सकाळी 11 वाजता राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरिअल हॉल येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व संजय घोडावत विद्यापीठाचे प्रेसिडेंट संजय घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने कुलगुरू व  संजय घोडावत हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 

या कार्यक्रमात नामवंत शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार आहे. या ठिकाणी व्याख्यानाद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शनिवारी (दि. 26) पहिल्याच दिवशी उद्घाटन सत्रानंतर दुपारी 12 ते 1 यावेळेत संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. ए. रायकर यांचे ‘उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने’, दुपारी 1 ते 2 पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे यांचे ‘अभियांत्रिकी महाविद्यालय व शाखेची निवड’ तसेच ‘रोजगाराच्या सर्वोत्कृष्ट संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 5 ते 6 यावेळेत विश्‍वकर्मा विद्यापीठाचे डीन डॉ. सुनील डोके यांचे ‘शोधू या करिअरच्या नवीन दिशा’ व सायंकाळी 6 ते 7 डॉ. डी. एच. पोवार यांचे ‘टुर्स आणि ट्रॅव्हल्समधील करिअरच्या संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. 26 ते 28 मे या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 

पुढारी एज्यु दिशा’मुळे विद्यार्थ्यांची उज्वल भवितव्याकडे होणारी वाटचाल अधिक सुकर होणार आहे. एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना करिअर निवड, माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. एज्यु दिशा पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, पुणे, सहयोगी प्रायोजक विश्‍वकर्मा विद्यापीठ, सहप्रायोजक चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन्स, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज फ इंजिनिअरिंग, पुणे व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे आहेत.