Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : ‘दाजीपूर’ आठवडाभर बंद

कोल्हापूर : ‘दाजीपूर’ आठवडाभर बंद

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 3:28PMकौलव : प्रतिनिधी

चौथी अखिल भारतीय व्याघ्र व मांसभक्षी प्राणी गणना आज (दि. 20) पासून सुरू होत आहे. त्यामुळे दाजीपूर येथील अभयारण्य गुरुवार (दि. 25) पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार आहे.

जगातील अतिसंवेदनशील संरक्षित वनांपैकी एक असणार्‍या पश्‍चिम घाटात दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे. विपूल जैवविविधता असलेले हे अभयारण्य 351चौरस किलोमीटर्सपर्यंत पसरले आहे. याठिकाणी पट्टेरी वाघासह बिबट्या, अस्वल, सांबर, गेळा, गवा रेड्यासह अनेक प्रकारच्या प्राण्यांची रेलचेल आहे. हे अभयारण्य दि. 1 नोव्हेंबर ते 31 मे अखेर पर्यटकांना खुले असते.
चौथी अखिल भारतीय व्याघ्र व मांसभक्षी प्राणीगणना आजपासून आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील अभयारण्ये आठवडाभर पर्यटकांसाठी बंद ठेवली जाणार आहेत. वाघ व मांसभक्षी प्राण्यांची गणना अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे. वनविभागाचे कर्मचारीच ही गणना करणार आहेत. ट्रॅन्सेक्ट लाईन व ट्रेक रूट पद्धतीने ही गणना केली जाणार आहे. झाडावर काढलेले ओरखडे, शिकार, विष्ठा याद्वारे प्राणी गणना केली जाणार आहे. ही गणना केवळ अभयारण्य क्षेत्रातच नव्हे तर वनक्षेत्रातही होणार आहे. संपूर्ण देशातच प्राणी गणना असल्याने कोयना, चांदोली व सागरेश्‍वर अभयारण्यही पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे पर्यटक व अभ्यासकांना आठवडाभर पर्यटनाचा आनंद घेता येणार नाही.

संपूर्ण देशातच व्याघ्र व मांसभक्षी प्राणी गणना होणार आहे. ही गणना आधुनिक पद्धतीने होणार असल्याने आठवडाभर अभयारण्य बंद राहणार आहे. पर्यटकांनी या काळात सहकार्य करावे.
- अनिल पाटील सहायक, वन्यजीव संरक्षक