Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Kolhapur › काम जमत नसेल तर पद सोडा 

काम जमत नसेल तर पद सोडा 

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आगामी निवडणुकांना सामोरे जावयाचे असेल तर त्यासाठी पक्षाची ताकद दिसण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची फळी दाखवली तरच भाजप किंवा अन्य पक्ष आघाडीसाठी विचारणा करतील, त्यासाठी आतापासूनच तयारी करा, पदरमोड करून पक्षाच्या नावावर गावोगावी, बूथ लेव्हलपर्यंत विविध कार्यक्रम राबवा, कार्यकर्त्यांच्या कमिट्या करा आणि त्याचा अहवाल आठ दिवसांत आपल्याकडे सादर करा, ज्यांना हे जमणार नाही, त्यांनी पद सोडून बाजूला व्हा, पदावरून कमी करण्याची वेळ आणू देऊ नका, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली. 

हे एकूण पक्षाच्या महिला, आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कार्यकर्त्यांना असे अपमानकारक बोलणार असाल तर आपल्या पक्षाची आणि पदाची गरज नाही, म्हणून त्या सभागृह सोडून निघून गेल्या तरीही ना. जानकर यांनी कार्यकर्त्यांची झाडाझडती सोडली नाही.

पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक साने गुरुजी वसाहत परिसरातील तलवार चौकातील केदारनाथ सांस्कृतिक भवनमध्ये झाली. पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
ते म्हणाले, पक्ष मोठा व्हावयाचा असेल तर कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्याची गरज आहे. ज्यांनी पदे घेतली आहेत, त्यांनी जबाबदारीने ही कामे करण्याची गरज आहे. तुम्ही पैसे मागता; पण तुमच्याकडे कार्यकर्ते कुठे आहेत, कार्यकर्ते नाहीत तरीही पैसे मागता, काम दाखवल्याशिवाय पैसे देऊन मूर्ख ठरणार नाही, असेही ते म्हणाले. यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तुमच्यात फरक पडणार नाही, तुमच्यासाठी जेवढा वेळ दिला तेवढा वेळ मी मराठवाडा, विदर्भातील सभांना घालवला असता तर तिथे एक आमदार निवडून येण्यापुरती तयारी झाली असती, असे सांगत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर ना. जानकर यांनी नाराजी व्यक्त केली.