Mon, Oct 21, 2019 04:11होमपेज › Kolhapur › जनतेच्या मनाचा ठाव घेणारा व्यापक सर्व्हे : डॉ. योगेश जाधव 

जनतेच्या मनाचा ठाव घेणारा व्यापक सर्व्हे : डॉ. योगेश जाधव 

Published On: May 04 2018 12:14PM | Last Updated: May 04 2018 12:14PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

गल्लीपासून दिल्लीपर्यंत पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले. राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेना युतीवर भरवसा ठेवला. पण, सत्ताधाऱ्यांनी जनतेला असमाधानीच ठेवल्याचे दिसते. गेल्या चार वर्षांतील राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल जनतेच्या मनात खदखद निर्माण झाल्याचे चित्र दैनिक ‘पुढारी’ने घेतलेल्या राज्यव्यापी ‘महा’सर्वेक्षणातून समोर आले आहे. निवडणुकीला वर्षभर बाकी असताना पुढारीने राज्यातील जनतेच्या मनातील सरकारबद्दलची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 'कौल मराठी मनाचा' या एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील महाचर्चेत ‘दै. पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव हे देखील सहभागी झाले होते. ‘पुढारी’ने केलेला सर्व्हे आतापर्यंतचा व्यापक सर्व्हे असल्याचे डॉ. जाधव म्हणाले.  

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील महाचर्चेत डॉ. योगेश जाधव म्हणाले की,  ‘पुढारी’ हा कायम जनतेचा आवाज म्हणून पुढे आलेला आहे. अशा वेळी हा आवाज बुलंद करण्याचा नवा प्रयोग म्हणजे ‘कौल मराठी मनाचा!’ महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत प्रथमच गल्ली ते दिल्ली एकाच पक्षाचे सरकार आहे. अशा वेळी जनतेच्या मनात नक्की आहे तरी काय, हे शोधणे गरजेचे आहे. म्हणूनच ‘पुढारी’चा विशेष प्रभाव असणार्‍या महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांत आपले खेडोपाडी पसरलेले वार्ताहरांचे नेटवर्क वापरून महाराष्ट्राचा कानोसा घ्यायचे आम्ही ठरवले. 

‘बिग डाटा अ‍ॅनॅलिटिक्स’सारख्या नव्या तंत्राची त्याला जोड दिली. जगभरात गाजणारे हे तंत्रज्ञान आता ‘पुढारी’ वापरत आहे. या निमित्ताने समोर आलेले निष्कर्ष हे राज्याच्या राजकारणाला दिशा देणारे आहेत. यातून महाराष्ट्राचा विशेषतः ग्रामीण भागाचा आवाज प्रतिबिंबित झाला आहे. यापुढेसुद्धा ‘पुढारी’ ‘समाजाच्या भल्यासाठी जागतिक तंत्रज्ञान’ या भूमिकेद्वारे नवनवे प्रयोग करत राहील. ‘पुढारी’चे वाचक या नव्या प्रयोगाचा स्वीकार करतील, याची खात्री आहे, असे दै. पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक  डॉ. योगेश जाधव यांनी म्हटले आहे. 

वाचा : ‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: लोक सरकारवर नाराज; पण...

वाचा : ‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: आता फडणवीस फॅक्टर! 

वाचा : युती-आघाडीचे राजकारण अटळ! पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण 

  WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19