Fri, Nov 16, 2018 23:28होमपेज › Kolhapur › ‘डीएसके’फसवणूक; गुंतवणूकदारांचे जबाब

‘डीएसके’फसवणूक; गुंतवणूकदारांचे जबाब

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 1:01AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पुण्यातील ‘डीएसके’ फर्मविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या कोल्हापूरसह जिल्ह्यातील 260 पैकी 235 गुंतवणूकदारांचे आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदविले आहेत. असे शुक्रवारी सांगण्यात आले.

गुंतवणूकदारांच्या जबाबानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 16 कोटी रुपयाची रक्‍कम डीएसके उद्योग समूहामध्ये अडकून पडल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंतवणुकीची मुदतपूर्ण होऊनही रक्‍कम परत देण्यास टाळाटाळ करणारे डी.एस.कुलकर्णी, त्यांची पत्नी व मुलाविरुद्ध 260 गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ज्यांनी डीएसके ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, जबाब नोंदविले नाहीत, अशा गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेशी त्वरित संपर्क साधून जबाब नोंदवावेत, असे आवाहन तपासाधिकारी तथा पोलिस उपधीक्षक राजेंद्र शेंडे यांनी केले आहे.