Wed, Jul 17, 2019 08:04होमपेज › Kolhapur › ‘त्या’ शिक्षण संस्थांचे स्थलांतर नको

‘त्या’ शिक्षण संस्थांचे स्थलांतर नको

Published On: Mar 11 2018 1:21AM | Last Updated: Mar 11 2018 12:38AMकुडित्रे : प्रतिनिधी  

कुंभी-कासारी सह.साखर कारखान्याच्या प्रशासनाने केवळ विरोधकांच्या अट्टाहासास बळी पडून डी.सी. नरके विद्यानिकेतन व श्रीराम हायस्कूल कुडित्रे या दोन्ही शाळांच्या हस्तांतर, स्थलांतर अथवा मालकी बाबत एकतर्फी निर्णय घेऊ नये. दोन्ही संस्थांचे अस्तित्व आहे तेथेच ठेवावे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विरोधकाप्रमाणे आमच्याशीही चर्चा करावी, अशी मागणी सत्तारूढ गटाने मोर्चाद्वारे केली. एकतर्फी निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनाचा दिला.

कुंभी-कासारी कार्यस्थळावरील कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.सी. नरके विद्यानिकेतन ही शाळा कारखान्याच्या सभासदांच्या मालकीची करावी, या मागणीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडीच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले होते. ही शाळा कारखान्याच्या मालकीची केली नाही तर 1 जूनपासून कारखान्याची निवासी शाळा तिथे भरवू, असा इशारा दिला होता. त्यावेळी दोन्ही शाळांच्या व्यवस्थापनास बोलावून, चर्चा करून एप्रिलपर्यंत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन चेअरमन आ. चंद्रदीप नरके यांनी दिले होते.
 यावेळी प्रा. वसंत पाटील, अरुण पाटील, के. डी. पाटील, तानाजी पाटील, विलास बोगरे उपस्थित होते.