Sun, Jul 21, 2019 08:15होमपेज › Kolhapur › सावधान... तुमची फसवणूक होतेय!

सावधान... तुमची फसवणूक होतेय!

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:58AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : एकनाथ नाईक 

सध्याचे युग संगणकाचे असून ‘कॅशलेस’ व्यवहारावर अधिक भर दिला जात आहे. विशेषत: डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करणार्‍यांनी सावध राहिले पाहिजे. कारण बँक खाते हॅक करून नायजेरियन टोळीने सव्वा कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची घटना नुकतीच कोल्हापूर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड पासवर्डद्वारे चोरटे ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपये परस्पर लंपास करत आहेत. त्यामुळे खातेदारांचे धाबे दणाणले आहे. आता खातेदारांनी स्वत:चे  डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित व  पासवर्ड गोपनीय ठेवले पाहिजेत.

नोटाबंदीनंतर सर्वत्र कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व वाढले आहे.नागरिकांनी देखील कॅशलेस व्यवहाराला पसंदी दर्शवली आहे. मात्र, बँक खाते हॅक करून ग्राहकांच्या खात्यावरील पैसेच गायब होऊ लागले आहेत. अनेकांनी पोलिसांत याबाबत तक्रारी देखील दिल्या आहेत. एखाद्या मॉल किंवा मोठ्या वस्तू खरेदी करताना ग्राहक डेबिट, क्रिडिट कार्डद्वारे व्यवहार करतात. जेव्हा ग्राहक पासवर्ड टाकतात तेव्हा तो चोरून पाहून किंवा सीमकार्डचा गैरवापर करून यूजर आयडी व पासवर्ड मिळविला जातो.

याही पुढे जाऊन हे महाठगे अमूक एका बँकेतून बोलत आहे असे सांगून पासवर्ड विचारून घेतात. एकदाका पासवर्ड किंवा यूजर आयडी मिळला की, चोरटे हातोहात खात्यावरील पैसे लंपास करतात, अशा अनेक घटना येथे घडल्या आहेत.अशा प्रकारच्या जिल्ह्यात महिन्याला तीन ते चार घटना घडत आहेत. बँका व पोलिसांनी देखील सावध भूमिका घेऊन अशा महाठग्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. असे असतानाही बँका व पोलिसांना चकवा देऊन चोरटे शक्‍कल लढवून परस्पर पैसे लाटत आहेत. 

कोल्हापूरच्या पोलिसांनी पाळत ठेवून नायजेरियन टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये महिलेसह चारजणांना गजाआड केले आहे. राज्यात अशा टोळ्यांनी थैमान घातले आहे. तर ग्राहक व बँका हवालदिल झाल्या आहेत. अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या घटनांमुळे पोलिस देखील हतबल झाले आहेत. अचानक खात्यावरील पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलवर किंवा ई-मेलवर आला की, ग्राहकांची झोपच उडते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी सावधानता बाळगली पाहिजे.

ऑनलाईन व्यवहारात ही घ्या काळजी...

ओटीपी (वन टाईम पासवर्ड) गोपनीय ठेवा
ट्रांझक्शन करता तेव्हा मोबाईलवर विविध प्रकारचे मेसेज येतात. त्यांना रिप्लाय देऊ नका.
तुम्हाला एखादा अनोळखी मेल किंवा फोन येत असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका
बँकिंग व्यवहारात टेक्नॉलॉजीचे बेसिक मुद्दे लक्षात ठेवा
शंका आल्यास बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा