Wed, Nov 14, 2018 12:20होमपेज › Kolhapur › रूकडीतील संचारबंदी उठवली 

रूकडीतील संचारबंदी उठवली 

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:33AM

बुकमार्क करा
रूकडी : वार्ताहर

भीमा कोरेगाव घटनेच्या  पार्श्‍वभूमीवर  येथे प्रशासनाने  लागू  केलेली  संचारबंदी रविवारी दुपारी 12  पासून उठवण्यात आली;  मात्र जमावबंदी आदेश कायम असल्याची  माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात  पिंगळे यांनी दिली. 

दलित बांधवांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रूकडीत दगडफेक, तोडफोड व जाळपोळीने हिंसक  वळण लागले. परिस्थितीचे  गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने 72 तासांची संचारबंदी लागू केली होती. शनिवारी दुपारी व सायंकाळी दोन तास दोन संचारबंदी शिथिल करून ग्रामस्थांना  दिलासा  दिला गेला. सध्या  गाव पोलिसांच्या नियंत्रणाखाली  असून सर्वत्र  शांतता  आहे.

ग्रामस्थांचे सहकार्य  पाहून प्रशासनाने संचारबंदी  उठवली  आहे.  यापुढे जमावबंदीचा  आदेश  कायम  ठेवला  असून यामध्ये गावात  5  पेक्षा  जादा  लोकांना  एकत्र थांबता येणार नाही. तसे  आढळल्यास  संबंधितांवर कठोर कारवाई केली  जाईल, असे पिंगळे, हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक सी. बी. भालके  यांनी सांगितले. दरम्यान, दगडफेकीत सहभाग असणार्‍यांचा पोलिसांनी शोध घेत दोन्ही समाजांतील 44  युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.