Tue, Apr 23, 2019 22:40होमपेज › Kolhapur › भरधाव क्रूझरच्या धडकेत बालक ठार

भरधाव क्रूझरच्या धडकेत बालक ठार

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 1:29AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

भरधाव क्रूझरने धडक दिल्याने श्रवण पांडुरंग बराटे या पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. कळवीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला होता. बेळगाव येथील रुग्णालयामध्ये  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कळवीकट्टी येथील महादेव अस्वले हे दड्डी-हत्तरकी रोडवर राहतात. त्यांचा भाऊही येथेच राहतो. त्यांच्या भावाची मुलगी पुण्यामध्ये असून काही दिवसांपूर्वी ती मुलगा श्रवणसह सुट्टीसाठी गावी आली होती. 11 मे रोजी दुपारी श्रवण रस्त्यालगत खेळत असताना भरधाव  क्रूझरने (एम.एच.13 एजी.7147) त्याला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नातेवाईकांनी तातडीने बेळगाव येथील रुग्णालयामध्ये हलवले होते.  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. श्रवणच्या मृत्यूनंतर महादेव अस्वले यांनी क्रूझर चालकाविरोधात गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल केला. अपघातानंतर या परिसरामध्ये वेगाने वाहन चालवणार्‍या चालकांबाबत संताप व्यक्‍त होत होता. यापूर्वीही याठिकाणी अनेक अपघात झाले असून याठिकाणी स्पीडबे्रकर बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.  हसते-खेळते मूल अचानक अपघातामध्ये गेल्याने मानसिक धक्‍का बसला आहे.