Sun, Apr 21, 2019 00:23होमपेज › Kolhapur › नृसिंहवाडी येथे कृष्णेत मृत मगर

नृसिंहवाडी येथे कृष्णेत मृत मगर

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:20AM

बुकमार्क करा
नृसिंहवाडी : प्रतिनिधी 

नृसिंहवाडी येथील कृष्णा नदीपात्रात आज सायंकाळी सात फूट लांबीची मगर मृतावस्थेत आढळली. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले असून, मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे अद्याप कळाले नाही.   

शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीपात्रात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज नृसिंहवाडी येथील मळीवाट मार्गावरील अशोक पाटील यांच्या मळी लगत कृष्णा नदीपात्रात आज सायंकाळी सात फुटी मगर मृतावस्थेत सापडली.

मगरीचे डोळे तोंडाचा भाग माशांनी खाल्ला आहे. शरीराचे कातडे जाऊन शरीर पूर्ण पांढरे पडले आहे. मगर कनवाड-घालवाड येथून वाहत आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले असून, मगरीचा पंचनामा करून ती ताब्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.