Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Kolhapur › आकुर्डे ते महालवाडी परिसरात मगरीचा वावर

आकुर्डे ते महालवाडी परिसरात मगरीचा वावर

Published On: May 20 2018 11:48AM | Last Updated: May 20 2018 11:48AMगारगोटी : प्रतिनिधी

गारगोटी ते महालवाडी दरम्यानच्या वेदगंगा नदीच्या पात्रात आज मगरीचे दर्शन झाले. या परिसरात प्रथमच मगरीचे दर्शन झाल्याने नागरिक धस्ताले आहेत. 
शनिवारी दुपारच्या सुमारास महालवाडी, म्हसवे ते गारगोटी पूल या परिसरात नदी पात्रातून मगरीचे दर्शन युवक आणि शेतकऱ्यांना झाले. काही उत्साही तरुणांनी या मगरीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. साधारण साडे तीन ते चार फुटाची मगर असल्याचे जाणकारांचे मत आहे. ही मगर काठावर आल्याची वार्ता समजताच लोकांनी नदीकडे धाव घेतली. युवकांनी जवळ जावुन मोबाईलवर फोटो घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची चाहुल लागताच मगर पात्रामध्ये गायब झाली.  

मोटर पंप सुरु करण्यासाठी दिवस शेतकऱ्यांना रात्री अपरात्री नदीपात्रात उतरावे लागत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये घबराट पसरली आहे. आज दुपारपासून वन विभागाचे कर्मचारी आणि दोन पोलीस यांनी कडक पहारा ठेवला होता. प्रत्यक्ष मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मगरीच्या वावर असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळत आहे. दरम्यान महिला, मुले यांनी नदी किनारी वावरताना दक्षता बाळगावी असे आवाहन वनक्षेत्रपाल अशोक पाटील आणि तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.