Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Kolhapur › खासगी सावकारी दहा जणांवर गुन्हा

खासगी सावकारी दहा जणांवर गुन्हा

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खासगी सावकारीतून दिलेल्या रकमेपोटी जादा व्याजाची मागणी करत सराफाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दहा सावकारांविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. बाबासो बापू पडवळ (वय 42, रा. पडवळवाडी, करवीर) यांनी फिर्याद दिली.

पडवळ यांचे गुजरी परिसरात दुकान आहे. त्यांच्याकडे एका महिलेने सोन्याची मागणी केली होती. तेवढे सोने उपलब्ध नसल्याने पडवळ यांनी ओळखीच्यांकडून पैसे हातउसने घेतले होते. या व्यवहारात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले;  पण त्यांनी घेतलेल्या पैशापोटी 5 टक्के ते 40 टक्के व्याजाची आकारणी सावकारांनी केली. गेले काही महिने सावकारांकडून मारहाण व दमदाटी होऊ लागल्याने पडवळ मानसिक तणावाखाली होते.

तक्रारीवरून मदन साठे (रा. संध्यामठ गल्‍ली, शिवाजी पेठ), जयकुमार पाटील (हालोंडी, हातकणंगले), संजय कारेकर (लक्ष्मी गल्‍ली), प्रफुल्‍ल शिराळे, शकुंतला नाईक (दोघे रा. शुक्रवार पेठ), विजय रामचंद्र पेडणेकर (मंगळवार पेठ), अनिकेत जयसिंग तोडकर (उत्तरेश्‍वर पेठ), सुनीता आडूळकर (बुधवार पेठ), चंद्रकांत सोनवणे (रविवार पेठ) तिरमित गवळी (राजेंद्रनगर) यांच्याविरोधात 506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.