Wed, Feb 20, 2019 01:20होमपेज › Kolhapur › रूकडीत ४४ युवकांवर गुन्हे

रूकडीत ४४ युवकांवर गुन्हे

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 06 2018 12:11AM

बुकमार्क करा
रूकडी : वार्ताहर

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दलित बांधवांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दलित बांधव व हिंदुत्ववादी संघटना यांच्यातील तोडफोड व जाळपोळीने हिंसक वळण घेतले होते. पोलिस प्रशासाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

बुधवारच्या महाराष्ट्र बंदला सायंकाळी दलित बांधव व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये शिवाजी चौक परिसरात जोरदार दगडफेक, वाहनांची तोडफोड व टपर्‍यांची जाळपोळ झाली. दगडफेकीत सोळा पोलिस कर्मचारी व शेकडो लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही समाजातील 44 युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेेत. 150 युवक पोलिसांच्या रडारवर आहेत.

संचारबंदी शिथिल करावी, विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत, याकरिता माजी खासदार निवेदिता माने, धैर्यशील माने यांचे शिष्टमंडळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची भेट घेणार आहेत. सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून, याबाबतचे निवेदन प्रांत समीर शिंगटे व जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांना दिले आहे.