Thu, Jun 20, 2019 00:55होमपेज › Kolhapur › बोगस दस्ताने जमीन विक्री तलाठ्यासह १२ जणांवर गुन्हा

बोगस दस्ताने जमीन विक्री तलाठ्यासह १२ जणांवर गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पाचगाव येथील जमिनीची बोगस दस्त व शिक्क्यांच्या आधारे परस्पर विक्री केल्याप्रकरणी बारा जणांविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ईलाई बाबालाल मणेर (रा. सानेगुरुजी वसाहत), अर्जुन जयवंत मिठारी (रा. पाडळी खुर्द) या दोन मुख्य संशयितांसह गावकामगार तलाठ्याविरोधातही सुरेश बंडोपंत पाटील (वय 34, रा. पाचगाव) यांनी फिर्याद दिली.

प्रेमला पंडितराव जाधव व उद्योजक चंद्रकांत पंडितराव जाधव यांची पाचगाव येथील प्लॉट नं. 25 क्षेत्र 371 चौरस फुटांची जमीन आहे. मुख्य संशयित ईलाई मणेर याने जाधव यांचे बनावट मतदान ओळखपत्र व आधारकार्ड बनवून जमीन स्वत:ची असल्याचा बनाव केला. ही जमीन त्यांनी विकसक सुरेश पाटील यांना विकली. याबाबत डिसेंबर 2014 ते जुलै 2015 कालावधीत सहायक दुय्यम निबंधक, करवीर यांच्यासमोर डायरी उतारा, सातबारा पत्रकी नोंदी करण्यात आल्या. तसेच खरेदीदस्ताद्वारे हा व्यवहार करण्यात आला. मात्र, या जागेत बांधकाम केल्यानंतर ही बाब मूळ मालक जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याला हरकत घेतल्यानंतर सुरेश पाटील यांनाही आपली फसवणूक झाल्याचे समजले.

याप्रकरणी मणेर व मिठारी या दोघांसह उत्तम बाबुराव शिंदे (रा. पाचगाव), संजय शिवाजी पाटील (रा. सानेगुरुजी वसाहत), मधुकर पांडुरंग देसाई (राजारामपुरी), अभिजित सुरेश देशपांडे (ताराबाई पार्क), समीर गुलाब शेख (उजळाईवाडी), संभाजी आनंदा गुरव (कळंबा), सुनील बारक्या खेडेकर (कागलवाडी, कसबा बावडा), मनोज राम रावळ (मंगळवार पेठ), जयंत जनार्दन कोपार्डे (फिरंगाई तालीम, शिवाजी पेठ) व पाचगाव गावकामगार तलाठी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Tags : kolhapur, kolhapur news, crime, bogus land sale, 


  •