होमपेज › Kolhapur › रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग भूसंपादनासाठी फेर मोजणी करा

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग भूसंपादनासाठी फेर मोजणी करा

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:20PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान आहे. यामध्ये शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये यासाठी भूसंपादन प्रक्रियेत फेर मोजणी करून अहवाल सादर करावा, अशी सूचना खा. राजू शेट्टी यांनी केली. याबाबत  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत खा. शेट्टी यांनी ही सूचना केली. 

नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग हातकणंगले, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यातून जातो. शाहूवाडी तालुक्यात भूसंपादन सुरु झाले आहे. भूसंपादनाबाबत शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेत शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन फेर मोजणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, अशी सूचना  खा. शेट्टी यांनी केली. टोप ते चोकाक या नवीन मार्गासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने टोप ते चोकाक मार्ग रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवून पर्यायी मार्गाचा वापर करावा.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आंबवडे ते बोरपाडळे मार्गावरील पुलाचा पुन्हा सर्व्हे करण्याचे आश्‍वासन दिले.  बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पुनर्वसन अधिकारी हदगल यांच्यासह हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Ratnagiri Kolhapur highway, land acquisition,