Mon, Sep 24, 2018 19:31होमपेज › Kolhapur › सर्दी, खोकला ‘व्हायरल’ 

सर्दी, खोकला ‘व्हायरल’ 

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 11:34PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून  सर्दी, ताप, खोकल्याने रुग्ण बेजार झाले आहेत. सरकारीसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी दिसत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये अद्यापही औषध टंचाई जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूंनी डोके वर काढले आहे. 

सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे याने जिल्ह्यातील नागरिक बेजार झाले आहेत. जिल्ह्यात लहान मुलांसह वृद्ध रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.पावसामुळे पाणी पुर्णतः गढूळ झाले आहे. त्यामुळे पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल विषाणूवाढीस पोषक असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.