Sat, May 30, 2020 14:23होमपेज › Kolhapur › कोरानाचा फटका; दीड एकरावरील कोबी पिकावर फिरवला ट्रॅक्‍टर 

कोरानाचा फटका; दीड एकरावरील कोबी पिकावर फिरवला ट्रॅक्‍टर 

Last Updated: Apr 01 2020 5:35PM
दानोळी (कोल्‍हापूर) : पुढारी वृत्‍तसेवा

कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या कलम 144 च्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काढणीला आलेल्या पालेभाज्यांवर ट्रॅक्टर घालण्याची आणि शेळ्या चारण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. अशीच वेळ कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्या शिरोळ तालुक्‍यातील दानोळीमधील एका शेतकऱ्यावर आली.­

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व बाजारपेठा, वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे दानोळीसह परिसरातील काढणीला आलेल्या पालेभाज्‍या उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. थोड्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेणाऱ्यांना मात्र आपले पीक ट्रॅक्टर घालून मुजवणे किंवा शेळ्या घालून चारण्याची वेळ आली आहे. यामुळे दानोळीसह परिसरातील गावात असे चित्र पहायला मिळत आहे. 

गेल्या आठ दिवसात दानोळी येथील शेतकरी प्रफुल्ल लंबे यांनी बाजारपेठ बंद असंल्याने आपल्या दीड एकर कोबी पिकात ट्रॅक्टर घालून पीक मुजवले. तसेच बापूसाहेब दळवी, सुनील खेत्राप्पा, अमित दळवी, अलमाने, कटारे, पाटील आदी शेतकऱ्यांनी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आपली पिके ट्रॅक्टरने मुजवली आहेत, तर काहींनी हाता तोंडाला आलेल्या पिकात शेळ्या सोडून पिकांवर पाणी सोडले आहे.