होमपेज › Kolhapur › डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा उद्या दीक्षांत समारंभ 

डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा उद्या दीक्षांत समारंभ 

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 1:14AM
कसबा बावडा : प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होत आहे. माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाषण देणार आहेत. यावर्षी शाहू महाराज यांना डी. लिट. व डॉ. अरुण कुमार अगरवाल यांना डी.एस्सी. पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे सकाळी 10.30 वाजता होणार्‍या दीक्षांत समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व कुलगुरू डॉ. प्रकाश बेहेरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘नॅक’चे सलग दुसर्‍यांदा ‘ए’ मानांकन मिळाले आहेे. त्याचबरोबर उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडिया टुडे व नेल्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्‍चिम विभागात तिसरे व राष्ट्रीय स्तरावर पंधरावे उत्कृष्ट कॉलेज म्हणून घोषित झाले आहे. वैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जात आहे.