Sat, Jan 19, 2019 15:55होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठाचा १९ रोजी दीक्षान्त समारंभ 

शिवाजी विद्यापीठाचा १९ रोजी दीक्षान्त समारंभ 

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाचा 54 वा दीक्षान्त समारंभ 19 मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चांद्रयान एक आणि मंगळयान या मोहिमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. सकाळी अकरा वाजता दीक्षान्त समारंभाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. दीक्षान्त समारंभात यंदा 50 हजार  244 पदवी प्रदान केल्या जाणार आहेत.

विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. दीक्षान्त समारंभास प्रमुख पाहुण्यांबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. यापूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा आणि मूळच्या महाराष्ट्रीयन असलेल्या सुमित्रा महाजन यांनी दीक्षान्त समारंभास उपस्थित राहावे, यासाठी  प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले होते; मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे दीक्षान्त समारंभासाठी अध्यक्षा महाजन  उपस्थित राहणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.