Fri, Jul 19, 2019 07:19होमपेज › Kolhapur › संस्कृत भाषा संवर्धनासाठी प्रयत्न

संस्कृत भाषा संवर्धनासाठी प्रयत्न

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:22AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

ब्रिटिश येण्यापूर्वी भारताचा इतिहास  प्रामुख्याने संस्कृत भाषेतील आहे; मात्र बदलत्या काळानुसार संस्कृत भाषेचं महत्त्व कमी झाले आहे. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. संस्कृत भारतीच्या वतीने एकदिवसीय संस्कृत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते  बोलत होते. 

ना. पाटील म्हणाले, संस्कृत भाषा ही प्राचीन काळापासून अविभाज्य अंग आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संस्कृत भाषा संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. आजच्या काळात भाषेचा प्रचार व प्रसाराचे कार्य महत्त्वाचे आहे. पुढील वर्षी होणार्‍या संमेलनावेळी आपण संस्कृत भाषेतूनच बोलू.

संस्कृत पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य माधव केळकर, संस्कृत पाठ्यपुस्तक लेखन समिती सदस्या सुवर्णा बोरकर यांनीही मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतून ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ वि. गो. देसाई यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला. यावेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य एच. वाय. होगनेकर, प्रा. हिंदुराव पाटील, शिवराम कुलकर्णी, विनायक केखलेकर, अतुल प्रभावळीकर, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतापसिंह दड्डीकर, जयवंत गायकवाड आदी उपस्थित होते.

वस्तू आणि पोस्टर्स

संमेलनास्थळी औषधी वनस्पती, शालेय साहित्य, व्यवहारापयोगी वस्तू, पूजेचे साहित्य, धान्य, फळे-फुले, प्राणी-पक्षी, दैनंदिन वापरातील वस्तू, घरगुती साहित्य यांची संस्कृत भाषेतील नावे असलेल्या वस्तू व पोस्टर्स लावण्यात आली होती.