होमपेज › Kolhapur › आगामी निवडणूकीत युती झाली नाही तर काँग्रेस सत्तेवर येईल : चंद्रकांत पाटील

आगामी निवडणूकीत युती झाली नाही तर काँग्रेस सत्तेवर येईल : चंद्रकांत पाटील

Published On: May 27 2018 12:23AM | Last Updated: May 26 2018 6:51PMकोल्हापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची अजून तरी  युती तुटलेली नाही, आणि ती  तुटणार  देखील नाही. मात्र आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत  युती झाली नाही तर काँग्रेस पक्षाला या निवडणूकीत सहज विजयी होता येईल, असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तर यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आले तर ते कशा प्रकारे राज्यकारभार करतात हे साऱ्यांनाच माहित आहे, असेही ते म्हणाले. कोल्हापूरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी त्यानी आज संवाद साधला.

यावेळी पाटील म्हणाले, पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सेना, भाजप जरी स्वतंत्रपणे लढत असले म्हणून युती तुटणार नाही. युतीसाठी आम्ही अगतिक आहोत. सर्वसामान्यांचे कल्याण आणि राज्य व देशाच्या हितासाठी भाजपा शिवसेनेशी युती करायला तयार आहे.  गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई महापालिकेतही आम्ही स्वतंत्र लढलो. मात्र सरकारमध्ये आम्ही  एकत्र आहोत.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सेनेसोबत युती करायला भाजप तयार असल्याचे महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. आहे. मात्र जर का शिवसेनेला युती करायची नसेल तर त्याला आमची काही हरकत नसल्याचेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.