Sat, Jan 25, 2020 06:45होमपेज › Kolhapur › अशोक चव्हाणांनी घेतली राजू शेट्टींची भेट

अशोक चव्हाणांनी घेतली राजू शेट्टींची भेट

Published On: Dec 02 2017 1:50PM | Last Updated: Dec 02 2017 1:50PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील युती सरकारमधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे भेट घेतली आहे. अशोक चव्हाण यांनी खासदार शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, कोणत्या राजकीय मुद्यावर चर्चा झाली, याचा तपशील मिळू शकलेला नाही. 
या भेटी वेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, पृथ्वीराज साठे, तौफिक मुल्लाणी, अनिल मादनाईक, भगवान काटे आदी नेतेही उपस्थित होते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्ताधारी भाजपशी फारकत घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेसच्या जवळ जाणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांत खासदार राजू शेट्टी यांनी भाषणांमध्ये अनेकवेळा या सरकारपेक्षा या आधीचे  सरकार बरे होते, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत किंवा त्याच्या आधी स्वभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेते, याची उत्सुकता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि खासदार शेट्टी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.