Sat, Apr 20, 2019 16:38होमपेज › Kolhapur › काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्याला 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्याला 

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 11:03PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापौर निवडणुकीत आ. सतेज पाटील हे कोणतीही ‘रिस्क’ घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे बैठक संपताच पाटील यांनी सर्वांना सहलीवर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्काळ सर्वांनी घरी जाऊन बॅगा घेऊन याव्यात, असे सांगितले. तोपर्यंत हॉलमधून हलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले; परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीची पार्टी मिटिंग झाल्यानंतर रविवारी सायंकाळी सर्व नगरसेकांना गोव्याला घेऊन जाण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या. नगरसेविकांबरोबर त्यांचे पती तर नगरसेवकांबरोबर पत्नी असे सर्वांना नेण्यात आले आहे. नातेवाईक व पी. ए. यांना नगरसेवकांसोबत नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 24 मे रोजी रात्री सर्वजण परतणार आहेत.