Mon, Jun 17, 2019 03:20होमपेज › Kolhapur › ओपन जीम साहित्य खरेदीवरून गोंधळ

ओपन जीम साहित्य खरेदीवरून गोंधळ

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 01 2018 11:27PMकोल्हापूर : प्रतिनिधी

ओपन जीमच्या साहित्य खरेदीची टेंडर प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. या प्रस्तावासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रेसच्या सदस्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता; पण अखेर सभापती आशिष ढवळे यांनी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर शहरात ओपन जीमची कामे महापालिकेच्या माध्यमातून आमदार फंडातून केली जातात. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. काँग्रेस नगरसेविकेच्या नातलगाला टेंडर देण्यात येणार होते, पण यासाठी टक्केवारी देण्याची तयारी नसल्याचे समजल्याने या टेंडर प्रक्रियेबाबत माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली. या कामासाठी आयएसओ मानांकन असणारे साहित्य खरेदी करण्याची अट आहे. संबंधित ठेकेदाराने या साहित्य खरेदीसाठी कमी दराने निविदा भरली नव्हती. काँग्रेस सदस्यांनी संबंधित ठेकेदाराला काम द्यावे, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही त्याला पाठिंबा दिला, तर भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी विरोध केला. यामुळे सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. काही सदस्यांनी पुढील मिटिंगमध्ये ठराव मांडण्यास सांगितले, पण ढवळे यांनी याच मिटिंगमध्ये निर्णय घ्यावा, असे सांगितले. यावरून काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी मतदान घेण्याचा प्रस्ताव ठेवला. यानंतर पुन्हा चर्चा झाली. ढवळे यांनी ओपन जीमसाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला. यामुळे महापालिकेच्या डाटा सेेंटरचे काम पाहणार्‍या एचसीएल कंपनीची मुदत संपली. पर्यायी यंत्रणा न उभारल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 15 मे रोजी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्राचे संगणकीय काम पाहणार्‍या एचसीएल कंपनीची मुदत संपली होती. प्रशासनाने स्वत: डेटा सेंटरचे काम चालवण्याचा निर्णय घेत यासाठी कर्मचारी नियुक्त केले, पण या कर्मचार्‍यांना योग्य ट्रेनिंग दिले गेले नसल्याने शुक्रवारी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत महापालिकेची नागरी सुविधा केंद्राची कामे ठप्प झाली होती. सदस्यांनी  ई-गव्हर्नन्स प्रकल्प सुरळीत ठेवण्याकरिता एचसीएल कंपनीकडून डेटा सेंटर सपोर्ट स्टाफ 3 महिनेकरिता उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. यासाठी एचसीएलला किती पैसे द्यावयाचे आहेत. महापालिकेने मुदत संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर का तयारी केली नाही. ही देण्यात येणारी रक्कम जास्त होत आहे. प्रशासनाला फक्त दोन महिन्यांची मुदत देत आहोत. याबाबत होणार्‍या नुकसानीस संबंधित अधिकारी व प्रशासन जबादार राहील, असा इशारा दिला.

यावेळी प्रशासनाने 13 मे रोजी  एचसीएलची मुदत संपलेली आहे. 3 महिने कालावधीसाठी 7 लाख 84 हजार रुपये अदा करावयाचे आहे. यासाठी कंपनी 3 टेक्निकल कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे. ई-गव्हर्नन्ससाठी महापालिकेची नवीन सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तोपर्यंत एचसीएलची सिस्टीम वापरली जाणार आहे.  

नीता गुरव यांनी नाले सफाई व्यवस्थित होत नाही. हनुमान नगर रोड ते जरगनगर येथील नाल्याच्या सफाईचे काम अर्धवट केल्याचे सांगितले. प्रशासनाने लवकरच  पाहणी करून काही कामे अधर्वट राहिलेली असतील तर ते नाले साफ सफाई करून घेऊ. मनपाची ब्लड बँक बंद करणार आहे. हे खेरे आहे का? अशी विचारणा कविता माने यांनी केली. यावर ब्लड बँकेत अतिरिक्त असणारे कर्मचारी इतर दवाखान्यात शिफ्ट करण्यात येणार आहे.