Tue, Apr 23, 2019 13:51होमपेज › Kolhapur › बिंदू चौकात आत्मचिंतन

बिंदू चौकात आत्मचिंतन

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 14 2018 11:55PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी शासनाकडून होत असलेल्या चालढकलमुळे सकल मराठा समाजबांधव आक्रमक झाला आहे. मंगळवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी ऐतिहासिक बिंदू चौकात भरपावसात आत्मचिंतन आंदोलन छेडले. ‘जय भवानी... जय शिवाजी, एक मराठा... लाख मराठा, अशा घोषणांनी बिंदू चौक दणाणले. 

सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत आंदोलक बिंदू चौकात ठिय्या मांडून होते. यावेळी प्रसाद जाधव, परेश भोसले, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, राहुल इंगवले, जयदीप शेळके, उदय लाड, दादासो देसाई यांच्याह सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते.  रंकाळ्यात बुधवारी (दि. 15) दुपारी साडेबारा वाजता पाण्यावर तरंगत आत्मक्‍लेश शवासन आंदोलन उदय लाड यांच्यासह सहकारी करणार आहेत.

ऐतिहासिक दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या बावीसाव्या दिवशीही जोर कायम आहे. जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, तालमी संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, विविध जाती-धर्मीय उपस्थिती दर्शवून मराठा आरक्षणासाठी सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देत आहेत. माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्यासह करवीर तालुक्यातील सडोलीसह परिसरातील नागरिकांनी दसरा चौकात ठिय्या मांडला.  जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या उपस्थितीच्या आवाहनास प्रतिसाद देत  स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमास सर्व सकल मराठा समाज एकत्रित जाणार आहे.

सकाळी दसरा चौकात सर्वांनी उपस्थित रहावे.  ग्रामसभेत मराठा आरक्षण देण्याबाबतचा ठराव करावा आणि ठराव बहुमताने मंजूर करून वाजत गाजत दसरा चौकातील ठिय्या आंदोलन स्थळी आणून देण्याचे आवाहन   केले आहे.  पाठिंब्याचा पहिला ठराव कारवाडीचा सकल मराठा समजाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ग्रामसभेचा मराठा आरक्षणाबाबतचा ठराव करून देण्याबाबत आवाहन केले आहे.त्यास प्रतिसाद देत कासारवाडी ग्रामस्थांनी पाठिंब्याचा ठराव दसरा चौकात शक्‍तिप्रदर्शन करत आणून दिला. यावेळी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्‍त समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तरुण मंडळे, महिला बचत गटांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.