होमपेज › Kolhapur › ठेकेदाराकडून पर्यायी पुलासाठी लाईन आउट पूर्ण

ठेकेदाराकडून पर्यायी पुलासाठी लाईन आउट पूर्ण

Published On: May 27 2018 12:47AM | Last Updated: May 27 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या उर्वरित बांधकामासाठी ठेकेदारांकडून शनिवारी लाईन आउट पूर्ण करण्यात आले. या लाईन आउटचे सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्गच्या अधिकार्‍यांसमोर सादरीकरण करून अंतिम मंजुरी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सोमवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

 प्राथमिक टप्प्यात  एका जेसीबीवर सपाटीकरणाचे काम सुरू होते.  गुरुवारी एकुण तीन जेसीबी, डोजर, डंपर आणि ट्रॅक्टर अशी यंत्रसामुग्री वाढवून दोन ते तीन दिवसात जमीन सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. नवीन पुलाच्या उर्वरित अब्युबमेंट  (पिलर) च्या उभारणीसाठी लाईन आउट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा पिलर नदीपात्राऐवजी बाहेर घेण्याचे नियोजन सुरू असून, तसे डिझाईन बनवून मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.  याचाच भाग म्हणून शनिवारी लाईन आउट घेण्यात आले. दहा अभियंत्यांनी हे काम पूर्ण केले.