Wed, Sep 19, 2018 20:14होमपेज › Kolhapur › पोलिस पाटलानेच अल्पवयीन मुलीस पळविल्याची फिर्याद

पोलिस पाटलानेच अल्पवयीन मुलीस पळविल्याची फिर्याद

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:16AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

कवठेसार (ता. शिरोळ) येथील पोलिस पाटलानेच अल्पवयीन  मुलीस पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या भावाने जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी पोलिस पाटील नंदकुमार बाळासाहेब पाटील विरुद्ध फिर्याद नोंद केली. 

कवठेसार हे पळवून नेलेल्या मुलीचे आजोळ आहे. ती आई, भावासह आजी व मामाकडे राहते.  पोलिस पाटलाच्या घरी आई व ही मुलगी दूध व दहीच्या पॅकिंगसाठी जात होती. 29 मे रोजी पाटील याने या मुलीला त्याच्या चारचाकी वाहनातून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पाटील याच्याविरुद्ध मुलीच्या मामाने 27 मे रोजी फिर्याद दिली होती. मात्र, रक्‍ताच्या नात्यातील कोणीतरी फिर्याद द्यावी याची प्रतीक्षा पोलिसांना करावी लागली. अखेर भावाने फिर्याद दिल्याने पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सोमवारी रात्री पोलिसांनी पाटील याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यातही आणले होते असे समजते. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने समजते.