Thu, Apr 25, 2019 17:45होमपेज › Kolhapur › फ्रेंडशिप डे’ निमित्त दैनिक ‘पुढारी’ तर्फे स्पर्धेचे आयोजन

मैत्रीचा संदेश नोंदवा, बक्षिसे जिंका!

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री होय. मैत्रीचे हे ऋणानुबंध आयुष्यभरासाठी राहावे, यासाठी फ्रेंंडशिप बँड, रेशमी धागा एकमेकांच्या मनगटांवर बांधत फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मैत्रीचा नाजूक धागा आणखी घट्ट करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’च्या वतीने ‘मैत्रीचा संदेश नोंदवा आणि बक्षिसे जिंका’, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी द फुड स्पेस आणि टायटस गॅलरी प्रायोजक आहेत.

मित्रांशिवाय जीवन अपुरे असल्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तीन दिवसांवर फ्रेंडशिप डे आल्याने अवघी तरूणाई सेलिब्रेशनच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त आहे. ‘फ्रेंडशिप डे’चे रंग शहरामधील गिफ्ट दुकानांमध्ये दिसू लागले आहेत. फ्रेंडशिप डे वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी गिफ्ट हाऊसमध्ये असंख्य व्हरायटी पाहायला मिळत आहेत. 

व्हॉटस्अ‍ॅप, मॅसेंजर, फेसबुक, ट्विटर, आदी सोशल मीडियावरून आतापासूनच मैत्रीचे संदेश फिरू लागले आहेत. मात्र शब्दरुपाने आपल्या मनातील भावना थेट मित्रांपर्यंत पोहोचविण्याची संधी दैनिक ‘पुढारी’ या स्पर्धेव्दारे उपलब्ध करुन दिली आहे. नोंदविलेल्या संदेशातून ड्रॉ पद्धतीने उत्कृष्ट संदेश निवडले जातील व बक्षीस दिली जातील.

संदेश नोंदविताना पहिल्या चार ओळीस 100 रुपये आकारले जातील. फुल तसेच इतर चिन्हांसाठी वेगळे दर असतील. पुढारी भवन, कोल्हापूर कार्यालय, इचलकरंजी, जयसिंगपूर, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गारगोटी आणि मूदाळतिट्टा येथे संदेश स्वीकारले जातील. सर्व छोट्या जाहिरात डेपो येथेही संदेश नोंदविता येणार आहेत. 5 ऑगस्टला संदेश दै. ‘पुढारी’तून प्रसिद्ध केले जातील.