Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Kolhapur › कॉमन मॅन रिक्षा संघटना वर्षात ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

कॉमन मॅन रिक्षा संघटना वर्षात ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 16 2018 1:28AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील रिक्षा चालकांना मीटर घेण्यासाठी शहरवासीयांनी रिक्षा चालकांना मदत केली. याच सामाजिक बांधिलकीतून आणि कोल्हापूर शहरात बसविण्यासाठी कॉमन मॅन संघटनेच्या वतीने येत्या वर्षभरात 50 सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात येणार आहेत. 

यातील 5 कॅमेरे संघटनेचे अध्यक्ष बाबा इंदुलकर यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. शासकीय विश्रामधामवर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

इंदुलकर म्हणाले, शासनाने सर्व रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्‍ती केली होती. त्या काळात रिक्षा चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर घेणे आर्थिकद‍ृष्ट्या परवडणारे नव्हते, अनेकांना कर्ज काढून मीटर बसविण्याची वेळ आली होती, त्यावेळी शहरातील पक्ष, संघटना व दानशूर व्यक्‍ती, नागरिकांनी आर्थिक मदत करून रिक्षा चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर घेण्यासाठी मदत केली. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांचे व्यवसाय सुरू राहिले आहेत, या ऋणातून उतराई व्हावी, यासाठी संघटनेच्या वतीने शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 5 कॅमेरे आज पालकमंत्र्यांकडे सुपूर्द करत आहेत, येत्या वर्षभरात 50 कॅमेरे देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास संघटनेचे अविनाश दिंडे, विजय गायकवाड, सुरेश धनवडे, उदय इनामदार, चंदू ओतारी, सुरेश पाटोळे, संभाजी रणदिवे, संतोष मिठारी, जाफर मुजावर, रमेश पोवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.