Wed, Sep 19, 2018 20:15होमपेज › Kolhapur › भाड्याच्या प्रॉपर्टींवरील घरफाळा कमी करण्यासाठी प्रयत्न : आयुक्‍त    

भाड्याच्या प्रॉपर्टींवरील घरफाळा कमी करण्यासाठी प्रयत्न : आयुक्‍त    

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 25 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात वाणिज्य प्रॉपर्टींबरोबरच भाड्याने दिल्या जाणार्‍या प्रॉपर्टींवर जादा घरफाळा आकारला जात असल्याचे क्रिडाईचे म्हणणे आहे. त्यानुसार भाड्याच्या प्रॉपर्टींवरील घरफाळा कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. मात्र, घरफाळा हा एकमेव महापालिकेच्या उत्पन्‍नाचा मोठा स्रोत आहे. त्यात कोणत्याही प्रकारची घट होऊ देणार नाही, असे मत आयुक्‍त अभिजित चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले.

आयुक्‍त म्हणाले, भाड्याच्या प्रॉपर्टींवरील घरफाळा कमी करायचा असल्यास तो वाणिज्य किंवा इतर प्रॉपर्टींवर वाढवावा लागेल. प्रशासनाकडून त्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल. त्याविषयी सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर महासभेला सादर केला जाईल. त्याचे सर्वाधिकार महासभेला आहेत. सद्यस्थितीत मिळणार्‍या घरफाळ्याची रक्‍कम कोणत्याही स्थितीत कमी होऊ दिली जाणार नाही. काही महिन्यांपासून शहरात झालेल्या सर्व्हेतून घरफाळा लागू नसलेल्या नव्या सुमारे 300 ते 400 इतक्याच मिळकती पुढे आल्या आहेत.