होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू : आ. क्षीरसागर

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू : आ. क्षीरसागर

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्याच्या सत्तेत असलो तरी मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. राजेश क्षीरसागर यांनी दिला. सकल मराठा समाज शौर्यपीठातर्फे शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आमदार क्षीरसागर यांनी बुधवारी आंदोलनास भेट दिली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा  व्यक्‍त करून  त्यांनी आरक्षणाची भूमिका मांडली. यावेळी आ. क्षीरसागर म्हणाले, आम्ही राज्याच्या सत्तेत आहोत; पण आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही मराठा समाजाबरोबर राहू. आंदोलनासह कोणत्याही कार्यक्रमास सर्वांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेऊ, असे त्यांनी सांगितले. 

बहुजन समाज पार्टीचे बाजीराव नाईक, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, गांधीनगर भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, महादेव विभुते, न्यू करवीर रिक्षा संघटनेचे राजेंद्र थोरावडे, अविनाश पाटील यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी राजू जाधव, प्रसाद जाधव, उदय लाड, अक्षय घाटगे, शिवाजीराव लोंढे, जयदीप शेळके, अण्णा तिलवे, बबन चावरे, सुभाष पाटील, दादासोा देसाई, दीपा पाटील, हेमा पाटील (लुगारे), सविता लोखंडे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनास पनोरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी येऊन पाठिंबा दिला.