Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Kolhapur › कर्नल जयवंत महाडिक यांचा अस्थिकलश उद्या कोल्हापुरात

कर्नल जयवंत महाडिक यांचा अस्थिकलश उद्या कोल्हापुरात

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:45PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने गोळी उडून मृत्युमुखी पडलेले कोल्हापूरचे सुपूत्र कर्नल जयवंत महाडिक यांचा अस्थिकलश शनिवारी (ता. 30) कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. कर्नल महाडिक यांचे मामा रणजित चव्हाण यांच्या बेलबाग येथील निवासस्थानी हा अस्थिकलश सकाळी 10 ते 12 या वेळेत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगा नदीत अस्थी विसर्जित केल्या जाणार आहेत. 

कर्नल महाडिक हे काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यातील खुंडरू येथे कार्यरत होते. सायंकाळी चारच्या सुमारास आर्मीच्या जीप्सीतून घरी जात असताना एका स्पीडब्रेकरवर ही गाडी आदळल्याने त्यांच्याजवळील पिस्तुलातून गोळी उडाली, ही गोळी त्यांच्या मानेत घुसली. त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. 

काल (ता. 27) त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लष्कराच्या स्मशानभुमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांच्या काही अस्थिंचे विसर्जन हरिद्वार येथे करण्यात आले. शनिवारी (ता. 30) उर्वरित अस्थित कोल्हापुरात दर्शनासाठी आणण्यात येणार आहेत. कर्नल महाडिक यांच्या भगिनी सोनाली रेगमी या अस्थिकलश घेऊन येणार आहेत. 
बेलबाग येथील आईस फॅक्टरीसमोरील रणजित चव्हाण यांच्या निवासस्थानी या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.