होमपेज › Kolhapur › 'कोल्हापुरात पुरग्रस्तांना आतापर्यंत १५ लाख रुपयांचे वाटप'

कोल्हापूर : पुरग्रस्तांना १५ लाख रुपयांचे वाटप'

Published On: Aug 14 2019 8:50AM | Last Updated: Aug 14 2019 8:50AM

संग्रहित छायाचित्र  कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरात महापुरामुळे 528 पाणी पुरवठा योजना बंद होत्या. त्यापैकी १६९ योजना सुरु करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजना सुरु करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीमधून 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. ३०८ कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे १५ लाख ४० हजार रुपये वाटण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पूरग्रस्त गावांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. १५ हजार कुटुंबांना १० किलो गहू व १० किलो तांदुळ मोफत देण्यात आले आहे. हा लाभ सर्व बाधित कुटुंबांना देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी माहिती दिली.

पुरामुळे २ लाख ३७ हजार वीज जोडण्या बाधित झाल्या होत्या. त्यापैकी १ लाख ७७ जोडण्या सुरु करण्यात आल्या आहेत. बाधित झालेल्या २६ उपकेंद्रांपैकी २३ सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच ५२८ पाणी पुरवठा योजना बंद होत्या त्यापैकी १६९ पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजना सुरु करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्हा आपत्ती निधीमधून १ लाख रुपयांचा निधी या योजनांच्या दुरुस्तीसाठी देण्यात येणार आहे.  

पूरग्रस्तांचे घरांचे नुकसान तसेच इतर साहित्यांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ग्रामीण भागात १० हजार रुपये तर शहरी भागात १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यापैकी ५ हजार रुपयांचा पहिला हप्ता ३०८ कुटुंबांना देण्यात आला. तसेच प्रतीदिन माणसी ६० रुपये व लहान मुलांना ४५ रुपये याप्रमाणे मदत देण्यास प्रांरभ झाला आहे, असेही ते म्हणाले.